बाणेर :
वसुंधरा अभियान बाणेर येथील संस्थेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन तुकाई टेकडी बाणेर येथे निसर्गरम्य वातावरणात करण्यात आले. संस्थेचे चित्रकला स्पर्धा आयोजनाचे हे दहावे वर्ष आहे.







वृक्षारोपण, निसर्ग संवर्धन, रक्तदान शिबिर त्याचबरोबर दरवर्षी मोठ्या प्रमाणात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यात आजूबाजूच्या परिसरातील शेकडो मुले टेकडीवर चित्रकला स्पर्धेसाठी जमा होतात. यात सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांसाठीच ही चित्रकला स्पर्धा वेगळीच ऊर्जा देऊन जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण यात आवडीने भाग घेतात आणि आपली कला कागदावर उतरवतात. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही 500 हून अधिक मुलांनी आणि पालकांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकालही तात्काळ लावण्यात आला यामध्ये गटाप्रमाणे प्रथम क्रमांक श्रवण सुरेश बावधने, माही दीपक दराडे, सुनील काटे तसेच द्वितीय क्रमांक अवनीश विकास वाघमारे, मायरा चौधरी, सानिका सलगर तसेच तृतीय क्रमांक प्रिया किशोर चौधरी, आयांश अरुण बोथे, समृद्धी प्रकाश सोनटक्के तसेच उत्तेजनार्थ मल्हार सदावर्ते, वीरा गांजेकर, अर्जुन मीनल यांना बक्षिस वितरित करण्यात आले. परीक्षक म्हणून खेमचंद खैरनार, कामिनी खैरनार, पल्लवी महाजन, श्रीकांत शिंपी, चंद्रशेखर टिळेकर, सुवर्णा टिळेकर, विशाल खैरनार यांनी काम पाहिले.
वसुंधरा अभियान बाणेर या वृक्षारोपण व संवर्धन तसेच पर्यावरण पूरक उपक्रम करणाऱ्या संस्थेकडून तुकाई टेकडी बाणेर येथे मोफत चित्रकला स्पर्धेचे आयोजन 500 हून अधिक विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धेचे हे दहावे वर्ष वसुंधरा अभियान कडून २००६ पासून तुकाई टेकडीवर ५२००० हून अधिक आणि ४५० हून अधिक प्रजातींच्या देशी झाडांची लागवड व संवर्धन पुण्याच्या मध्यवर्ती भागात सिमेंटच्या जंगलात मानवनिर्मित जंगल निर्माण करणारी वसुंधरा अभियान संस्था समाजापुढे आदर्श.








