भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

0
slider_4552

बाणेर :

भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे पार पडला. दिनांक 20 डिसेंबर रोजी आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला यावेळी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनी कराटे, डंबेल्स लेझीम पिरामिड पॅराशुट या विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखविले. यावेळी संस्थेचे संस्थापक शिवलाल  धनकुडे तसेच अध्यक्ष सौ सुरेखा ते धनकुडे सेक्रेटरी विराज धनकुडे खजिनदार राहुल धनकुडे सर्व संस्थेचे प्रतिनिधी यांचे विद्यार्थ्यांना सर्व क्रीडाशिक्षक प्राचार्य तर तसेच सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रथमता शालेय स्तरावर स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आणि त्यामधून खेळाडूंची निवड करून फायनल करिता स्टेडियम मध्ये मुलांनी स्पर्धा मुलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर IAS ऑफिसर सुबराव पाटील, अंकुर कावळे मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सदाशिव साळुंके कक्षा अधिकारी गृह विभाग मंत्रालय मुंबई, भारतीय प्रो कबड्डी चे गोल्ड मेडलिस्ट माननीय  सिद्धार्थ देसाई, एडवोकेट .दिलीप शेलार, संजयनांना मुरकुटे वसुंधरा अभियान बाणेर आणि  योगेश शिर्के क्रीडा अधिकारी यांचे विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सर्व क्रीडा शिक्षकांचे यावेळी पाहुण्यांनी कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेखा काळे ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ कोमल शिंदे सर्व कॉर्डनेटर्स आणि संस्थेच्या सीईओ सुषमा भोसले त्यांनी सर्वांचे आभार मानले.

See also  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणी प्रमाणे एक पाऊल पुढे टाकता आले तर या स्मारकाचे सार्थक होईल : नाना पाटेकर