पाषाण :
श्री स्वामी समर्थ चरण पादुकांचे दर्शन सोहळा पाषाण सुस रोड येथील मुंगळे महाराज श्री दत्त ध्यान मंदिर येथे सोमवार दिनांक 22 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आव्हान, श्री दत्त ध्यान मंदिराचे विश्वस्त माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी केला आहे.







अक्कलकोट राजघराण्यांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन आपल्या पवित्र पादुका प्रदान केल्या होत्या. या पवित्र चरणकमलांचे दर्शन विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे. अक्कलकोट राजघराण्याकडून दीडशे वर्षानंतर प्रथमच पुण्यनगरीतील भाविकांसाठी सोमवारी सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत या पादुका दर्शनाचा लाभ पाषाण सुसरोड येथे घेता येणार आहे.
स्वामीभक्तांच्या सेवेसाठी ‘अनुभूती’ या प्रकल्प अंतर्गत हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे स्वामीभक्तांच्या सेवेसाठी ‘अनुभूती’ या नावाचा एक भव्य प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे. या प्रकल्पा अंतर्गत श्री स्वामी समर्थाची १०८ फूट भव्य दिव्य मूर्ती, ध्यान केंद्र, चिकित्सालय, उद्यान, भक्तनिवास अशा मूलभूत आणि पूरक सुविधांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टचे आशिष कदम यांनी दिली.







