गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय येथे विविधा : प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम उत्साहात पार….

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय येथे विविधा: प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड आणि मॉडर्नाइट्स माजी विद्यार्थ्यी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली २५ वर्ष सातत्याने सुरू आहे. या वर्षी तिमिरातून तेजाकडे या संकल्पनेचा ध्यास घेऊन यंदा हा मेळावा रौप्य महोत्सवी वर्षात पाऊल ठेवून उत्साहात साजरा केला गेला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेविका आणि मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगरच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते झाले, आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांना शुभेच्छा देऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील भावनिक नाते कसे आहे याचे उदाहरण देऊन नव्या पिढीला माणसे जपा एआय माणसांची जागा घेऊ शकत नाही, असे आवाहन केले. असे कार्यक्रम मुलांचे सर्वांगीण विकास करतात, नावकौशल्य आत्मसात करण्यास मदत करतात त्यामुळं असे कार्यक्रम महाविद्यालयात झाले पाहिजेत. तसेच राजकारणात उच्चशिक्षितांचे प्रमाण वाढत असल्याने जसा राजकारणात बदल घडत आहे तसे समाज बदलत आहे असे त्या म्हणाल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात पाहुण्याचे स्वागत करत विविधा कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, गेली २५ वर्ष हा कार्यक्रम सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन नव उद्योजक घडवून आर्थिक विकासाला चालना देत आहे.
5000 च्या वर विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास भेट देऊन दरवर्षी प्रोत्साहन देतात. या वर्षीच्या 3 दिवासाची विक्री रु 5,18,018 आहे.

Rj अपूर्वा यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
ज्ञानदीप अकॅडमीचे ॲड. महेश शिंदे हे या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रोग्रेसव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.शामकांत देशमुख आणि वाणिज्य विभागाचे उपप्रचार्या डॉ. शुभांगी जोशी ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या वेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक किरण देसाई, स्वप्नील बेळगावकर, अभिजित बंडेवार आणि प्रा. जयश्री खर्चे उपस्थित होते.
गेली 25 वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन डॉ ज्योती गगनग्रास व प्रा विजया कुलकर्णी यांनी केले आहे. या वर्षी हस्तकला, खाद्यपदार्थ आणि सामाजिक संस्था असे एकूण ५० स्टॉल असून यामध्ये २०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. तसेच मॉडर्न शेफ, पोस्टर स्पर्धा झाली असून सायंकाळी पुरुषोत्तम पारितोषिक विजेते आणि अनेक पारितोषक विजेते नाटक वामन आख्यान सादर झाले.

See also  पुण्यातील रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी महानगरपालिका देणार 25 हजार रूपयांचे अनुदान...

दुसऱ्या दिवशी यशोगाथा, आई माझ्या महाविद्यालयात, आणि दुपारी रंगतरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाची सांगता आठवणीतले मॉडर्न या माजीं विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने झाली. प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजाजन एकबोटे, सहकार्यवाह, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी या कार्यक्रमासाठी शुभाशीर्वाद दिले आहेत.
अक्षय वाघमारे, सुदनवा पानसे व डॉ सागर काणेकर हें कला क्षेत्रातील तसेच अनेक नामवंत माजी विध्यार्थी उपस्थित होते.
यावर्षी विविधाला डॉ. पल्लवी निखारे व प्रा पूजा यादव यांनी साहाय्य केले. ऋतुजा चांदेकर या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे ईशस्तवन आणि पसायदान सादर केले.
या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात अनेक उद्योजक तयार झाले आहेत.