डॉ. निवेदिता दास यांना ‘स्टार गोल्डन प्रेसिडेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

0
slider_4552

पुणे :

पहिल्याच वर्षी ‘स्थापित क्लब’ गटात इनर व्हील क्लब ऑफ पुणे इम्पिरियलची उल्लेखनीय कामगिरी; डॉ. निवेदिता दास यांना ‘स्टार गोल्डन प्रेसिडेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावर्षी प्रथमच ‘स्थापित क्लब’ (Established Club) गटात सहभागी झालेल्या इनर व्हील क्लब ऑफ पुणे इम्पिरियलने उल्लेखनीय यश संपादन केले. पुणे येथे ४ व ५ जुलै रोजी आयोजित इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१३च्या ४२ व्या डिस्ट्रिक्ट असेंब्ली ‘अवंतिका’ मध्ये क्लबच्या अध्यक्षा डॉ. निवेदिता दास यांना इनर व्हील वर्ष २०२५–२६ साठी प्रतिष्ठेचा ‘स्टार गोल्डन प्रेसिडेंट – क्रमांक २’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याच समारंभात इनर व्हील क्लब ऑफ पुणे इम्पिरियलला सर्व प्रकल्प विभागांमध्ये Certificate of Excellence, Happy School Project साठी Medal तसेच क्लबच्या माजी अध्यक्षा व खजिनदार साक्षी निकम यांना Best Treasurer Award प्रदान करण्यात आला. हे सर्व पुरस्कार असोसिएशन अध्यक्षा विनुता हरिश व डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या यशाबद्दल डॉ. निवेदिता दास यांनी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, माजी अध्यक्षांचे, सदस्यांचे, स्क्रुटिनी समितीचे तसेच इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१३ च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सामूहिक प्रयत्न, उत्कृष्ट नेतृत्व आणि प्रभावी समाजसेवेची ही गौरवपूर्ण दखल असल्याचे त्यांनी नमूद केले.

See also  रुपी सहकारी बँक या पुण्यातील नामवंत बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तातडीने विलीनीकरण करावे : गिरीश बापट