2024 टी20 विश्वचषकाचे प्रारूप बदलले, संघांची वाढली संख्या, नव्या पद्धतीने होणार सामने..

0
slider_4552

इंग्लंड :

ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाची धामधुम संपली. इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक आपल्या नावावर केला. त्यानंतर आता 2024 टी20 विश्वचषक स्पर्धेची तयारी देखील सुरू झाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या पुढील विश्वचषकाचे प्रारूप कसे असेल याबाबत नुकतीच माहिती दिली. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून टी20 विश्वचषकात संघ वाढवण्याबाबत जी मागणी होत होती, ती मागणी यावेळी पूर्ण झालेली दिसत आहे.

आयसीसीने नुकतेच 2024 टी20 विश्वचषकाचे प्रारूप जाहीर केले. या विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होतील. पात्रता फेरीत प्रत्येकी पाच संघांचे चार गट या विश्वचषकात आपल्याला दिसतील. यानंतर प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर 8 फेरी खेळतील. त्या आठ संघाचे दोन गटांमध्ये विभाजन होईल. त्यानंतर या दोन गटातील पहिल्या व दुसऱ्या स्थानी राहणारे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 2024 टी20 विश्वचषकाचे यजमानपद वेस्टइंडीज व अमेरिका भूषवतील.

आतापर्यंत टी20 विश्वचषकात 16 संघ सहभागी होत आले आहेत. त्यातील 8 संघांना थेट मुख्य फेरीत जागा मिळत होती. तर, उर्वरित आठ संघ पात्रता फेरी खेळत. पात्रता फेरीतून चार संघांना मुख्य फेरीत जाण्याची संधी मिळते. त्यानंतर प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये सुपर 12 फेरी खेळवली जाते.

टी20 विश्वचषक 2024 साठी सध्या 12 संघ पात्र ठरले आहेत. यजमान असल्याने वेस्ट इंडिज व अमेरिका यांना थेट संधी मिळेल. 2022 टी20 विश्वचषकात अव्वल 8 संघात राहिलेल्या इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व नेदरलँड्स यांना पुढील विश्वचषकात जागा मिळाली आहे. तर, नोव्हेंबर 2022 पर्यंत टी20 क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये असलेल्या अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी देखील या विश्वचषकासाठी पात्रता मिळवलीये.

See also  रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्स चा दक्षिण आफ्रिका लिजेंड्स वर विजय