बाणेर :
डॉ.कलमाडी शामराव हायस्कूल बाणेर या शाळेतून आरोही मंगेश चोंधे इयत्ता नववी मध्ये शिकत असून, तिने इंटरनॅशनल स्पोर्ट्स तायक्वांदो मध्ये सिल्वर व ब्रांझ बदक पटकावले.
साऊथ कोरिया मध्ये इंटरनॅशनल स्पोर्ट्स तायक्वांदो पुमसे मध्ये ब्रांझ मेडल आणि फाईट मध्ये सिल्वर मेडल मिळवले आहे. यामध्ये तिचे प्रशिक्षक राजेश पुजारी यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच कलमाडी शाळेने देखील पाठबळ दिल्याने स्पर्धेत यश मिळवणे सोपे गेले आहे.
ती ह्या तायक्वांदो खेळा मध्ये आठ वर्ष प्रशिक्षण घेत आहे. तिला ह्या खेळाची अतिशय आवड आहे. आठ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर तीने आंतरराष्ट्रीय दर्जावर पदक पटवले आहे. तसेच तीने कलमाडी शाळेची स्पोर्ट्स मध्ये बेस्ट प्लेयर म्हणून ट्रॉफी मिळाली आहे. 2025 मध्ये black belt Dan two ची परीक्षा तीने दिली आहे. या यशाबद्दल शाळा व परिसरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.