बाणेर :
बाणेर येथील राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अवैद्य वृक्षतोड करण्यात आली आहे. बाणेर येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या समोरील बरीच झाडे जेसीबी व मशिनच्या साह्याने तोडण्यात आली आहेत. झाडे तोडण्यासाठी महानगरपालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. पर्यावरण दृष्टीकोनातून महत्त्वाची असलेली पिंपळ लिंब निलगिरी अशी महत्वपूर्ण देशी झाडे तोडण्यात आले आहेत.
वृक्षतोड करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. बाणेर टेकडी वर हजारो वृक्षांचे संवर्धन होत असताना बाणेर परिसरामध्ये मात्र सर्रास अवैद्य वृक्षतोड होते ही बाब चिंताजनक आहे.
याबाबत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.