बाणेर
बाणेर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. बाणेर मधील तीनही नगरसेवक मिळून बाणेर मधील विकासकामे हाती घेतले आहे. तिन्ही नगरसेवक मध्ये विचारविनिमय होऊन गावातील अंतर्गत सिमेंट रस्ता, ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही अशी तीन कोटीचा वरती निधी खर्च होईल अशी कामे करण्यात येणार आहेत.
बाणेर हा पुण्यातील स्मार्ट सिटी मध्ये सामाविष्ट असलेला भाग असून गावातील अंतर्गत भाग सुद्धा स्मार्ट असायला हवा. या दृष्टीने तीनही नगरसेवकांना एकत्रित येऊन गावातील नागरिकांना विचारात घेऊन गावचा विकास घडवण्याच्या दृष्टीने जे पाऊल टाकले आहे त्यास शुभेच्छा व सहकार्य करू असे डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले.
नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी सांगीतले की, गावच्या विकास व्हावा याच दृष्टीने आम्ही एकत्र काम करत आहोत.गावच्या विकासा मध्ये कुठेही कमतरता होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले की, गावचा विकासासाठी कोणतेही राजकारण न करता एकत्रितरीत्या गावातील विकास कामे मार्गी लावणे हे लक्षात ठेवून विकास कामाला सुरुवात करत आहोत. या कामात कोणतीही कमतरता जाणवणार नाही याची दक्षता घेवू असे त्यांनी सांगितले.
नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, गावातील विकास कामासाठी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी एकमेकांची सहाय्यक भूमिका ठेवून आम्ही तीनही नगरसेवक काम करत आहोत. यामध्ये कोणताही पक्ष राहणार नाही केवळ बाणेर गावचा विकास हाच पक्ष यादृष्टीने यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. जिथे जिथे विकास कामांना अडथळा निर्माण होईल, तिथे सर्वांशी विचारविनिमय करून मार्ग काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, बाणेर नागरी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, मनसे चे रवींद्र गारुडकर, अर्जून शिंदे, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, डॉ. सागर बालवडकर, प्रकाश बालवडकर, समीर चांदेरे, विशाल विधाते, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवंत भुजबळ अर्जुन शिंदे राजेंद्र ताम्हाणे, राजेंद्र कळमकर, मल्हारी सायकर, तसेच गुलाबराव तापकीर, राजाराम कळमकर, महादेव कळमकर सुधाकर धनकुडे नासिर सय्यद, संतोष भुजबळ, राजेंद्र विष्णू कळमकर, परशुराम विधाते सहदेव हरिहर, सोमनाथ धनकुडे, दत्तात्रय भुजबळ, राजेश विधाते, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी श्रीफळ फोडून व टिकाव मारून विकासकामांना सुरूवात केली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कळमकर यांनी केले, तर प्रल्हाद सायकर यांनी आभार व्यक्त केले.