मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद

0
slider_4552

पुणे:

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून(MNS) खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात मनसेकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

See also  पुण्यात आज केवळ पावणे अकरा पर्यंत हॉटेल पार्सल सेवेस परवानगी.