लॉन्ड्री व्यावसायिक संघ, पुणे यांच्या वतीने भव्य लॉन्ड्री व्यावसायिक मेळावा उत्साहात संपन्न..

0
slider_4552

पुणे :

लॉन्ड्री व्यवसायातील विविध समस्या, व्यवसाय विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शासनाच्या योजना आणि संघटनात्मक बळकटी या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी लॉन्ड्री व्यावसायिक संघ, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य लॉन्ड्री व्यावसायिक मेळावा गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नारायणराव पवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद वाकोडकर (प्रदेशाध्यक्ष, भाजप उद्योग आघाडी, महाराष्ट्र), प्रमुख वक्ते अनिल हुफरीकर (प्रदेश कार्याध्यक्ष, महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळ), तसेच विशेष उपस्थिती म्हणून विश्वास ननावरे (नगरसेवक, पुणे महानगरपालिका) आणि सुरेश नाना नाशिककर (माजी उपमहापौर), नंदकुमार राऊत (संचालक जनसेवा सहकारी बँक पुणे) (उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस), विश्वजीत देशपांडे (युवक प्रदेशाध्यक्ष), श्रीरंगभाऊ मोरे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी लॉन्ड्री व्यवसायासमोरील आव्हाने, योग्य दर, वाढता खर्च,आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि संघटितपणे काम करण्याचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्यवसाय अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी सन २०२६ चा “आदर्श लॉन्ड्री व्यावसायिक पुरस्कार” सुधीर दळवी यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

मेळाव्याला पुणे शहर व परिसरातील मोठ्या संख्येने लॉन्ड्री व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन लॉन्ड्री व्यावसायिक संघ, पुणे चे अध्यक्ष गणेश चव्हाण,कार्याध्यक्ष सतीश शिंदे, सचिव निलेश राऊत, खजिनदार शेखर पवार तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी यशस्वीरीत्या केले.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, सर्व लॉन्ड्री व्यावसायिक, सहकारी संस्था आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

See also  राज्य सरकारनेच ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळविण्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक : चंद्रकांत पाटील