नवरात्रीत विविध उपक्रम राबवणारे अखिल म्हाळुंगे गाव नवरात्र उत्सव मंडळ…

0
slider_4552

म्हाळुंगे :

अखिल म्हाळुंगे गाव नवरात्र उत्सव मंडळ या वर्षी ९ व्या वर्षात भक्तीमय वातावरणात पदार्पन करत आहोत. मंडळाने मागील ८ वर्षापुर्वी गावातील महिलाभगिंनी करिता या मंडळाच्या माध्यमातुन एक व्यासपीठ निर्माण करुन दिले.

या ८ वर्षात मंडळाने सामाजिक सांस्कृतीक कला क्रिडा सारखे कार्यक्रम घेतले. यात किर्तन, होम मिनिस्टर, आरोग्य शिबिर, असे सामाजिक अनेक उपक्रम हाती घेतले व घेत आहेत. यात प्रामुख्याने गावातील कुटुंबात नवरात्रित १० दिवसात ज्या कुटुबांत कन्यारत्न प्राप्त होईल त्यांना मंडळाकडुन पाळणा व रोख रक्कम देवुन सन्मानित करण्यात येते व स्त्री जन्माचे स्वागत केले जाते.

स्त्रियांच्या सन्मानासाठी कन्यापुजन च्या माध्यनातुन ५१ लहान मुलींचे कन्यापुजन केले जाते. त्यांना शालेय उपयोगी वस्तु देवुन पुजन करण्यात येते. मंडळाच्या वतीने दांडीया स्पर्धा देखिल मोठ्या उत्सहात होतात. १० दिवस रोज स्पर्धा होते. रोज १० विजेते यांना बक्षिसे दिली जातात व शेवटच्या दिवशी अतिंम दांडिया स्पर्धा उत्साहात पार पडते यावेळी विजेत्यांना टिव्ही, फ्रिज, वाॅशिग मशिन, गॅस शेगडी, नथ, पैठणी पारितोषिक दिले जाते. तर लहान गट सायकल, स्टडी टॅबल, शालेय वस्तु अशा अनेक बक्षिसे देण्यात येतात. हे कार्यक्रम भविष्यात घेत राहु अशी माहिती मंडळाच्या पदाधिकारी कडून देण्यात आली.

See also  स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी