पैशावर विश्वास नका ठेवू, विश्वासावर पैसा ठेवा हे सांगणारी योगीराज पतसंस्था : ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे

0
slider_4552

बाणेर :
योगीराज सहकारी पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली, याप्रसंगी सहयोगी संचालकपदी भंडारा डोंगर ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, निकिता माताडे यांना नियुक्ती पत्र चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. तसेच 21 गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

पैशाला पवित्रेचा स्पर्श झाला की त्याचा उल्लेख लक्ष्मी असा होतो आणि योगीराज पतसंस्थेचे संचालक व स्टाफ यांच्या आपुलकीच्या भावनेतून संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होताना दिसत आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांची क्वालिटी फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टर सल्लागार समिती सदस्य पदी नेमणूक झाल्याबद्दल, संचालक सचिन चव्हाण यांना दैनंदिन लोकमत च्या वतीने लंडन येथे बेस्ट बिझनेसमन अवॉर्ड मिळाल्याबद्दल आणि वरदान कोलते यांस राज्य टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले बद्दल, मार्च महिन्यात सर्वाधिक ठेव संकलन केल्याबद्दल संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे यांचा तसेच वर्षभरात विक्रमी कलेक्शन केल्याबद्दल विनोद जाधव, विकास होले, रघुनाथ भुजबळ, आर्या निम्हण या दैनंदिन प्रतिनिधींचे संस्थेच्या वतीने विशेष सन्मान वांजळे महाराज, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सर्वांच्या समोर वाचून दाखविला आणि सांगितले की, संस्थेच्या 155 कोटी एकूण ठेवी, सभासद कर्ज 118 कोटी तसेच आर्थिक वर्षात 3 कोटी 84 लाख रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे. सभासदांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 15% लाभांश देण्यात येणारआहे.

याप्रसंगी गोसेवक संजय बालवडकर, दत्तात्रय तापकीर, रामदास मुरकुटे, अनिल बालवडकर, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, संचालक संजय बालवडकर, गणेश तापकीर, संचालिका वैशाली विधाते, रंजना कोलते, अलका सिरसगे, सदस्य प्रदीप नेवाळे, पंढरीनाथ गायकवाड, पांडुरंग कदम, माजी संचालक खंडू मांडेकर, अमर लोंढे, अशोक रानवडे, वसंत माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे सभासद, खातेदार, स्टाफ व दैनंदिन प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  नव्याने समाविष्ट गावांचा २४/७ पाणी पुरवठा योजनेत समावेश करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

आलेल्या सर्वांचे स्वागत व सूत्रसंचालन रविंद्र घाटे यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.