पाषाण :
पाषाण येथील गो.रा. कुंभार हायस्कूल १९९९-२००० बॅच चा माजी विद्यार्थी मेळावा रविवारी मैत्री दिना दिवशी उत्साहात पार पडला.तब्बल पंचवीस वर्षांनी भेटलेले मित्रमंडळी व शिक्षक वर्ग यांच्यात चांगलीच हितगुज रंगलेली पहावयास मिळाली. पुन्हा एकदा शिक्षकांनी वयाच्या या टप्प्यावरचे मार्गदर्शन करून शाळा भरवली व जमलेल्या मुला मुलींनी ते उपदेश व बोध आनंदाने ऐकत आगळावेगळा मैत्री दिन साजरा केला.
विद्यार्थी दशेतल्या तुमच्या जबाबदाऱ्या आणि सध्याच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. सध्या तुम्ही समाजातील महत्त्वाचा घटक असून त्यानुसार सर्वजण आपापल्या क्षेत्रात कार्य करत आहेत. हे कार्य करत असताना तुम्ही सर्वजण पालकाच्या भूमिकेत आहात आपल्या पाल्याला योग्य ती शिकवण द्या, आपली संस्कृती शिकवा, आणि माजी विद्यार्थी ग्रुपचे माध्यमातून एकमेकांना सहाय्य करा असे, मत मार्गदर्शन करताना प्रभाकर गायकवाड यांनी मांडले.
या मेळाव्या प्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक हनुमंत चव्हाण, सोपान पाटील, नामदेव धुमाळ, प्रभाकर गायकवाड, वसुंधरा पाटील, स्नेहलता पोकळे, मालन कोंडे, शीला मालुंजकर, मानिक धनाने, आर. व्ही. गायकवाड, यु.एस. जाधव, आदी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी सचिन परदेशी, गणेश शिंदे, विजय पानसंबळ, कुलदीप निम्हण, ऋषिकेश कुलकर्णी, संदीप सोनवणे, अजय जागते, शीतल निम्हण, सुवर्णा कोकाटे, कल्पना कोंडावळे, विजय निम्हण, विजय पानसंभळ, दिनेश बाणेकर, कल्पना गोळे, स्वाती सुतार आदी केले होते.
शाळा पुन्हा सुरू करण्याचे आव्हान..
पाषाण मधील गो.रा. कुंभार शाळा ही गोरगरिबांची शाळा म्हणून ओळखली जात होती. एक एक वर्ग बंद करून ही अनुदानित मराठी शाळा बंद करण्यात आली आहे. ही शाळा पुन्हा सुरू करण्याचा लढा सुरू असून यात माजी विद्यार्थ्यांनीही सहभाग घ्यावा असे मत यावेळी माजी मुख्याध्यापक हनुमंत चव्हाण यांनी मांडले.