माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड तर्फे आर्थिक साक्षरतेची” कार्यशाळा

0
slider_4552

आकुर्डी :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड तर्फे १९ जुलै २०२५ रोजी “दादाची शाळा” या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डी ई ए फंड ‘रिझर्व बँक आँफ ईंडियाच्या अंतर्गत “आर्थिक साक्षरतेची” कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेत सदानंद दिक्षित, एक्स सीईओ पुणे पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँक व  बिपीन देवकर, ईपीडब्ल्यूआर, मुंबई यांनी मार्गदर्शन केले.

दिक्षित यांनी उत्पन्न, खर्च व बचत यांचे प्रमाण सांगितले. ते म्हणाले,” १०० रुपयातील २० रुपये बचत म्हणून ठेवा. लहान वयातच बचतीची सवय करा. उत्पन्न असेल तरच खर्च करा.”  देवकर यांनी ” रिझर्व बँक व सरकारच्या योजना, लोकपाल व ईतर स्किम यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.”

अक्षय गोंदकर मॅनेजर, रिझर्व बँक आॅफ ईंडिया यांनी आर्थिक साक्षरतेची माहिती दिली. सायबर फ्राॅड आणि डिजिटल बँकिंगची माहिती त्यांनी दिली व यशस्वी कार्यक्रमासाठी अभिनंदन केले.

दादाच्या शाळेतील कार्याची माहिती देताना अमोल शिंदे म्हणाले, या मुलांना आम्ही शिक्षण आणि शिस्त हे दोन्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या १० वर्षात शाळेची खुप प्रगती झाली आहे. अभिजित पोखर्णीकर यांनी या शाळेतील मुलांना मदतीची गरज आहे. आर बी आयचा मदतीचा हात जर मिळाला तर अजून मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील असे सांगितले.

बँक आॅफ महाराष्ट्राच्या आकुर्डी शाखेने विद्यार्थ्यांचे अकाउंट ओपन करुन दिले. हा तिसर्या टप्प्यातील १३ कार्यक्रम अतिशय छान पार पडला. कार्यक्रमात मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून पिगी बँक देण्यात आली. एफ बी एफ च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाचे समन्वय डाॅ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विजया कुलकर्णी यांनी केले. बँकेची शपथ श्रध्दा कुलकर्णी हिने घेतली.

See also  मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी रस्त्यांची संयुक्त पाहाणी करून प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणी घेतला आढावा