कोथरूड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेचे स्नेहसम्मेलन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अत्यंत उत्साहात व जल्लोशात संपन्न झाले.
“विधाता” म्हणजेच सृष्टी चा निर्माता या थीम वर आधारित शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. देव हा फक्त मुर्तीत नसून विविध रूपामध्ये आढळतो मग गणपती असो शंकर महादेव असो कृष्ण असो वा राम असो हे सर्व फक्त विधात्याची रूप आहेत .विधाता हा प्रत्येक रूपात असतो अगदी आई वडील आपले गुरु हे देखील विधात्याची रूपे आहेत असा खूप मोलाचा संदेश सूस शाखेच्या चिमुकल्यानी त्यांच्या प्रत्येक पर्फोर्मँसेस मधून दिला. राम, हनुमान, महाकाली,शंकर महादेव ,येळकोट येळकोट जयमल्हार आदी एक से बढ़कर गाण्यांवर अत्यंत बहारदार पर्फोर्मँसेस सादर करून प्रेक्षक व पाहुण्यांचे अगदी डोळे दिपवणारे आविष्कार सादर केले.
अगदी सुरुवातीला राष्ट्रगीताने नाट्यगृहाचा पडदा उघडून कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर , पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक दिलीपअण्णा वेडेपाटील , बाणेर विभागाच्या नगरसेविका स्वप्नालीताई सायकर , कोथरूड विभागाच्या नगरसेविका छायाताई मारणे , नांदेगावच्या सरपंच निकिताताई रानवडे , आरतीताई रानवडे , सविताताई दगडे , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. नाट्यगृहाच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्याना “स्टूडेंट ऑफ द इयर हा मानाचा किताब देऊन मुकुट , सर्टिफिकेट व ट्रॉफी प्रदान करून विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले .
यावेळी शाळेतर्फे मान्यवरांना देखील पुष्पगुच्छ व पुणेरी पगडी बहाल करण्यात आली तसेच मानचिन्ह देऊन सर्वांना सन्मानीत करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी शाळेचा चढता आलेख त्यांच्या वार्षिक अहवालात सादर करून वर्षभरात राबवलेल्या सर्व उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे , शिक्षकांचे ,मान्यवरांचे व पालकांचे आभार मानले व दिवसेंदिवस हा आलेख असाच वाढून आता यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे नमूद केले.
तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी विधाता यातच सर्व काही आले असे सांगून सूस शाखेच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मुख्याध्यापिका , शिक्षक व सर्वांचे मनापासून कौतुक करून आज येथे असणारा प्रत्येक विद्यार्थी मोठाच होणार व या व्यासपीठावर आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाखेमधून निर्माण होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
तसेच खरच लहान लावलेल्या पेरिविंकल च्या रोपट्याचे वटवृक्षात्त रूपांतर होत असताना बघून खूप अभिमान वाटतो व सर्व शिक्षक व विद्यार्थी हे कलागुण असलेले आहेत हे सर्वांच्या सादरीकरण याच्यातून दिसून आले असे प्रतिपादन शंकर भाऊ मांडेकर यांनी केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी ,सचिन खोडके, शिवप्रसाद पुजारी सर व सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभा कुलकर्णी यांनी करून निवेदन प्रफुल्ला पाटील व इयत्ता 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते. तर पाहुण्यांचे स्वागत व प्रस्तावना वैभव मुरकुटे यांनी केली.