पाषाण-सुतारवाडी परिसरातील रस्त्यांच्या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात : राहुल कोकाटे

0
slider_4552

पाषाण :

पुणे शहर भाजप उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी पाषाण-सुतारवाडी परिसरातील वाहतूक कोंडी, अर्धवट रखडलेली रस्त्यांची कामे व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारी यांना निवेदन दिले.

याबद्दल माहिती मॅकन्यूज ला देताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी सांगितले की, पुणे विद्यापीठ ते पाषाण गाव रस्त्यावरील गतिरोधक खराब झाले आहेत. ते दुरुस्त करण्यात यावेत व सदर रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे. तसेच सुतारवाडी ते काॅसमाॅस बॅक रस्त्यावरील रोड वाईंडनिंग करुन डांबरीकरण करण्यात यावे, सदर रस्ता वाहतूकसाठी सुरळीत झाल्यास सुसरोड वरील वाहतुकीचा ताण कमी होईल, शिवाय स्ट्रीट फाॅर पीपल्स अंतर्गत सुसरोड वर चालु असलेल्या कामाला गती देण्यात यावी व पदपथासमोरील राडारोडा त्वरित साफ करण्यात यावा. तसेच अनेक वर्ष रखडलेल्या 36 मी. बाणेर-पाषाण लिंकरोड च्या कामाला लवकरात लवकर पूर्ण करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून त्या त्वरित मार्गी लागणे गरजेच आहे याची दखल अधिकाऱ्यांनी घेऊन नागरीकांना होणारा त्रास कमी करावा अशी विनंती केली आहे.

पथ विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारी यांनी त्वरित कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी उपअभियंता पथ विभाग शितल जोशी, विकास बोंबले उपस्थित होते.

See also  डॉ. सागर बालवडकर आयोजीत एस के पी रोलिंग ट्रॉफी’ टी-१० इंटर सोसायटी क्रिकेट प्रिमिअर लीगचे उदघाटन संपन्न