नवले पुलाच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तीव्र उतार कमी करण्यासाठी नऱ्हे जंक्शन ते नवले पूल या दरम्यान उड्डाणंपुल – शंभूराजे देसाई

0
slider_4552

नागपूर :

मंगळवार, दि. २७ डिसेंबर, २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांची लक्षवेधी सूचना कर. १७४८ चर्चेसाठी घेण्यात आली होती. या लक्षवेधी सूचनेमध्ये तापकीर यांनी पुढीलप्रमाणे वस्तुस्थिती सभागृहात मांडली :

पुणे, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, वारजे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी (दरीपुल) बोगद्यामार्गे मुंबई – बंगळुरू मार्गात गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून ठिकाणी गेल्या आठ वर्षांमध्ये 188 हुन अधिक अपघात झाले असून त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असतांना ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत. या अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे या परिसरातील असणारा तीव्र उतार असताना प्रशासन तात्पुरते उपाय करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही ठिकाणी सेवा रस्ते नसल्याने स्थानिक वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गवरुन प्रवास करावा लागत असून यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना म्हणून मुख्य उतार कमी करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरीपुल यामधील तीव्र वळण कमी करणे, सर्व्हिस रस्ते सलग तयार करून रुंद करणे, दुरुस्ती करणे, तेथील अतिक्रमणे काढणे, अनधिकृत होर्डिंग काढणे, रिंगरोड तयार करून वाहतूक शहराबाहेरून वळविणे, वारजे ते नवले पूल, नवले पूल ते कात्रज दरम्यान सर्व्हिस रस्ता करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. व साधारणतः १५ वर्षापूर्वी वारजे, वाडगाव, कात्रजच्या महापालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये महामार्गाच्या बाजूला १२ मीटरचा सर्व्हिस रस्ता दर्शविला आहे. परंतु तो पूर्ण करण्यात आला नाही व प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारीतील नवले पूल, वडगाव ते वारजे या भागातील सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्णतः झाले नसल्याचे सांगत पुढीलप्रमाणे प्रश्नांवर मुख्यत: चर्चा घडवून आणली.

(१) स्वामी नारायण मंदिर ते नवले पुलाच्या दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत असतांना तात्पुरत्या उपाययोजना न करता तीव्र उतार कमी करण्यासाठी नऱ्हे जंक्शन ते नवले पूल या दरम्यान उड्डाणंपुल करण्यात यावा असा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तातडीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार का?

See also  भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला आहे : सुशीलकुमार शिंदे

(२) नऱ्हे आंबेगाव व वडगाव भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूस नवीन वसाहती / सोसाईटी झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांची संख्या वाढली असतांना सलग सेवा रस्ते नसल्यामुळे स्थानिक वाहतूक महामार्गावर येण्याशिवाय पर्याय नसल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होतात. ते टाळण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूस पुणे महानगरपालिकेकडून १२ मी. रुंदीचे अतिरिक्त सर्व्हिस रोड विकसित झाले नसल्याने ते किमान ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे महापालीकेला आदेश देणार का?

(३) सद्यस्थितीत नऱ्हे येथील सेल्फी पॉईट जवळ १ स्पीड कॅमेरा बसविण्यात आलेला आहे. आणखी एक कॅमेरा कात्रज बोगदा ते दरीपुलाच्या दरम्यान बसविणे तसेच कात्रज बोगदा ते दरीपुलाच्या दरम्यान वाहतूक नियंत्रणासाठी महामार्ग पोलीस चेक पोस्ट सुरु करणार का?

(४) वडगाव उड्डाण पुल (Flyover) व मुठा नदीवरील पूल हा चार पदरी आहे आणि महामार्ग सहा पदरी असलेने या पट्ट्यात वाहतूक कोंडी सततची आहे. याकरिता पुलाच्या दोन्ही बाजूस स्वतंत्र सेवा रस्त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला (NHI) ला पुलाचे बांधकाम करण्याचे आदेश देऊन पुला लगतचे १२ मिटर सेवा रस्ते महापालिका प्रशासनाला पूर्ण करण्याचे आदेश देणार का ?

(५) कात्रज ते नवले पुल तसेच कात्रज नवीन बोगदा ते वडगाव व पुढे नवले पूल ते वारजे डुक्कर खिंड या मार्ग हद्दीमध्ये असलेल्या व्यावसायिक अतिक्रमण, होर्डिंग, वाहनतळ सारख्या प्रकारांमुळे, वारजे -डुक्कर खिंड मार्गात सर्व्हिस रस्त्यावर फुटपाथ व त्याचा पार्किंग म्हणून होतं असलेला वापर यामुळे रस्ते अरुंद होतं असल्याने वाहचालक महामार्गांवर विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने देखील अपघात होतं असल्याने ही अतिक्रमणे १५ दिवसांत निष्कासित करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश देणार का?

या प्रश्नांना सभागृहात उत्तर देताना शंभूराजे देसाई मंत्री (कार्यभार) , सार्वजनिक बांधकाम यांनी उत्तर देतांना हा रस्ता कात्रज बोगदा ते दरी पुल पुणे बायपास रस्ता आहे. आमदार भिमराव तापकीर यांनी तेथील उड्डाणपुलाबाबत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. निश्चितच हा मोठा उड्डाणपूल असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा प्रस्ताव पाठविला जाईल. आमदार तापकीर यांनी प्रस्ताव गेल्यानंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घ्यावी. केंद्रीय मंत्री गडकरी हे महाराष्ट्रातील सर्वच कामांना प्राधान्य देत असतात. तशी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय व्यक्तिगत विनंती करतील.

See also  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह राज्यसरकारने केलेल्या निलंबन विरूद्ध कोर्टात जाणार

हा उड्डाणपूल झाल्यास अपघात टळणार असून वाहतूक कोंडी सुटणार आहे. हा महत्वाचा उड्डाणपूल असणार असून आमदार तापकीर यांनी अतिशय योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी विनंती केली जाणार असून राज्य स्तरावर मी स्वतः मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयकडून व्यक्तिगत पाठपुरावा करून उड्डाणपूल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सेवा रस्ते ज्या ठिकाणी नसतील व डीपी च्या रस्त्यांना ज्या अडचणी असतील त्या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असून या बाबतीत महानगरपालिकेच्या संबंधिताना आजच सूचना करणार असून तातडीची कार्यवाही करण्यास सांगणार असून सेवा रस्ते ताब्यात घेऊन भूसंपादनासाठीच्या निधीची तरतूद बजेट मध्ये प्राधान्याने करण्याचे सांगण्यात येणार असून ज्या ठिकाणी जागा ताब्यात आहेत. तिथ प्रथम प्राधान्याने सेवा रस्ते करण्याचे आदेश महानगरपालिकेला देणार आहे. तसेच स्पीड गन ची वाहने पुण्याच्या पालकमंत्री यांना विनंत्ती करून उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. तसेच वडगाव उड्डाण पुल (Flyover) व मुठा नदीवरील पूल हा चार पदरी आहे आणि महामार्ग सहा पदरी असलेने तशी माहिती घेऊन महामार्ग प्राधिकरणाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले.