बावधन येथे दिपक दगडे यांनी बनवलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले उद्घाटन..

0
slider_4552

बावधन :

बावधन येथे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उपसरपंच दिपक दगडे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अदिती दिपक दगडे पाटील यांच्या संकल्पनेतून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बनविण्यात आलेल्या ‘विरंगुळा’ कट्ट्याचे उद्घाटन संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना तिळगुळ वाटप करण्यात आले.

याबद्दल माहिती देताना माजी उपसरपंच दिपक दगडे पाटील यांनी सांगितले की, परिसरात बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक एकमेकांना भेटत असतात, एकमेकांशी संवाद साधत असतात त्यांना निवांत बसून संवाद साधता यावा यासाठी ज्येष्ठ नागरिक ‘विरंगुळा’ कट्टा तयार केला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या मूळ घराचं नाव ‘ विरंगुळा ‘ असल्याने सुप्रिया ताईंनी हे नाव या कट्ट्याला सुचविले.

या वेळी महादेव कोंढरे अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, रणजित शिवतारे उपाध्यक्ष जिल्हा परिषद, सुनिल चांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सविता दगडे मा. अध्यक्षा जिल्हा परिषद, दिलीप दगडे संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, मा. नगरसेविका सायली वांजळे , मा. नगरसेवक प्रमोद निम्हण, कालिदास गोपालघरे संचालक पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ, बालम तात्या सुतार मा स्वि नगरसेवक, योगेश सुतार, सूर्यकांत भुंडे ग्रामपंचायत सदस्य, मयुरी तोडकर ,मनिषा भोसले, सुहास दगडे,गणेश दगडे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

See also  कोथरूडजवळील चांदणी चौकात बसला भीषण आग सर्व प्रवासी सुखरूप..