बावधन :
बावधन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ग्रा. सदस्य सुर्यकांत भुंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुजाता सुर्यकांत भुंडे यांच्या माध्यमातून तयार केलल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.




याबद्दल माहिती देताना युवा नेते ग्रा. सदस्य सुर्यकांत भुंडे म्हणाले की, आपल्या जीवनात दिनदर्शिकेचे फार मोठे महत्व आहे. तारीख वार, सण – सणवार, तिथि अशी इंत्यभुत माहिती असणारी मराठी दिनदर्शिका परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देत आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
यावेळी महादेव कोंढरे अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, रणजित शिवतारे उपाध्यक्ष जिल्हा परिषद, सुनिल चांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सविता दगडे मा. अध्यक्षा जिल्हा परिषद, राजाभाऊ हगवणे, किरण भुंडे, मा. उपसरपंच दिपक दगडे, विश्वास दगडे, सुजित भुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.








