दिल्ली:
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. गेले तीन दिवस या सगळ्या सुनावणीत अनेक वाद-प्रतिवाद पाहायला मिळाले. ज्यानंतर काल (16 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला. हे संपूर्ण प्रकरण नबाम रेबिया निकाल भोवती फिरत आहे. याचबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर सुनावणी संपल्यानंतर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जाणार का? याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, यावेळी कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवत आहोत. एवढंच जाहीर केलं.
यामुळे या प्रकरणाचा नेमका निकाल कोर्ट केव्हा देणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आता याचविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यानुसार आता कोर्ट याबाबत आज (17 जुलै) निकाल सुनावणार आहे.
तर प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे जाणार नाही!
महाराष्ट्र विधानसभेचे सभापती आणि काही सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणातील युक्तिवादाचा मुख्य आधार असलेल्या नेबाम रेबियावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये सुधारणा किंवा बदल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ शुक्रवारी निकाल देणार आहे.
नबाम रेबिया प्रकरणातील मागील घटनापीठाचा निर्णय विचारासाठी मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज आहे का? या निर्णयात बदल किंवा सुधारणा करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने ठरवले तरच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाईल.
पण कोर्टाला वाटलं की हे प्रकरणाची सुनावणी सात जणांच्या न्यायमूर्तींपुढे करण्याची गरज नाही तर मग पाच जणांच्या खंडपीठासमोरच मूळ प्रकरण ऐकले जाईल. ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांचं अधिकार क्षेत्र आणि आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.
प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं यासाठी ठाकरे गट आग्रही!
खरं तर हे हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे द्यावं अशी ठाकरे गटाची मागणी आहे. तर शिंदे गटाच्या मते हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे देण्याची गरज नाही. यासाठी गेले तीन दिवस दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद हा सुरू होता.
नबाम रेबिया निकाल फेरविचार करण्यासाठी हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं जाणार का? हा सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि विधानसभा उपाध्यक्षांसंदर्भातील मुद्द्यावरही सर्वोच्च काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. कृष्ण मुरारी या पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. ज्याचा आज निकाल दिला जाईल.