बाणेर येथील श्री बाणेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील श्री बाणेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त व महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. १७/०२/२०२३ ते १८/०२/२०२३ रोजी करण्यात आले आहे.

श्री बाणेश्वर हे ऐतिहासिक पांडवकाली मंदिर असून या ठिकाणी या ठिकाणी शिवलिंग आहे. बाणेर भागातील बाणेर गावाचे नावही या बाणेश्वर मंदिरापासूनच पडले असल्याचे सांगण्यात येते. बाणेर गावाच्या प्रवेश केल्यानंतर भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणेस तूकाई टेकडीवर बानेश्वर लेणी आहे. अनेक भक्त महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी दर्शनास येतात यावर्षीही वर्धापन दिन व महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमांमध्ये होम हवन, रांगोळी स्पर्धा, होम मिनिस्टर, शिवभक्त की लहर, समस्त बाणेर गाव महिला भजनी मंडळ भजन, इंडियन आयडल फिल्म जगदीश चव्हाण यांची भक्ती संगीत असे कार्यक्रम होणार आहेत.

महाशिवरात्री व वर्धापन दिनानिमित्त मंदिरात भाविकांना भक्तिमय वातावरणासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नॉलेज ऑफ टेम्पल या संकल्पनेतून हे मंदिर विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष संदीप वाडकर यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष संदिप वाडकर, गणेश भुजबळ, गणेश तापकीर, अमोल टिळेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर येथून चार वर्षीय मुलाचे अपहरण