यावर्षीचा बालेवाडी सिटीझन अवॉर्ड जगदीश भोसले, स्वप्ना नारायण, संदीप मंडलोई यांना प्रदान.

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या वतीने या वर्षी पासून बालेवाडी परिसरात उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या नागरिकांना बी. डब्लू. एफ सिटीझन अवॉर्ड ची सुरवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमत्ताने आयोजित कार्यक्रमात सन २०२३ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यंदाचा पुरस्कार हा जेष्ठ नागरिकांसाठी केलेल्या उत्कृष्ठ कार्यासाठी जगदीश भोसले, आणि संदीप मंडलोई यांना देण्यात आला तर सिव्हिक ऍक्टिव्हिझम आणि पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामासाठीचा पुरस्कार स्वप्ना नारायण यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन चे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

अधिक अधिक नागरिकांनी आपल्या भागाच्या विकासासाठी लोकांच्या प्रगतीसाठी, नवीन नवीन संकल्पना राबवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि आपले योगदान देण्यासाठी पुढे आले पाहिजे, त्या कामाची दाखल समाज घेत असतो हे आजच्या पुरस्कारातून सिद्ध होते असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

बालेवाडी फेडरेशन च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले हे पुरस्कार म्हणजे बालवाडीत उत्कृष्ठ काम करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या पाठीवर बालेवाडी या कुटुंबाच्या सदस्यांनी दिलेली कौतुकाची थाप आहे, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत असताना पुढील काळात फेडरेशन या पुरस्कार्थींच्या सोबत त्यांनी अधिक व्यापक काम करावे यासाठी खंबीर पणे उभं राहणार असल्याचे मत आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये फेडरेशन चे कार्यकारणी सदस्य अमेय जगताप यांनी व्यक्त केले. त्यांच्याच संकल्पनेतून हे पुरस्कार सुरु करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित झालेल्या कार्यक्रमात मिलिंद जोशीराव यांचे ‘शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर व्याख्यान झाले.

आशिष कोटमकर व ऍड इंद्रजित कुलकर्णी यांनी मान्यवरांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. फेडरेशन चे उपाध्यक्ष परशुराम तारे, अशोक नवाल, खजिनदार डी. डी सिंग, कार्यकारणी सदस्य विकास कामात, मोरेश्वर बालवडकर, शकील सलाटी, वैभव आढाव, डॉ. सुधीर निखारे, रुपाली राईकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये पुढाकार घेतला, अस्मिता करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर ऍड. एस. ओ. माशाळकर यांनी सर्वांचे आभार मानले

See also  सचिन दळवी यांच्या कार्यालयात आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियान उत्साहात पार.