सचिन दळवी यांच्या कार्यालयात आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियान उत्साहात पार.

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

भाजपा युवा नेते सचिन दळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियान कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.

याची माहिती देताना भाजपा युवा नेते सचिन दळवी यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आधार कार्ड नोंदणी करण्याची सुविधा तसेच त्याच्या मध्ये दुरुस्ती करण्यासाठी चे अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे.

यावेळी बोलताना भाजपा कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष पुनीत जोशी म्हणाले की सचिन दळवी सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या वतीने नागरिकांना विविध सुविधांचा लाभ व्हावा यासाठी हे अभियान राबविले आहे. त्यांनी आपल्या कामाने सर्वसामान्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. ते पुढील काळात देखील अशीच कामे करतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते पोस्टल अधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. या प्रसंगी युवानेते सचिन दळवी, पोपटराव जाधव, चिंतामणी दळवी, जगन्नाथ दळवी, धनंजय बामगुडे भरत जोरे, संतोष सपकाळ, सचिन दळवी मित्र परिवार उपस्थित होता.

See also  प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन.