सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशनच्या वतीने ११०० महिलांना मोफत तीर्थ यात्रा दर्शन

0
slider_4552

पाषाण :

सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशनच्या वतीने पाषाण, सुतावाडी, बावधन, सोमेश्वरवाडी परिसरातील ११०० महिलांना मोफत श्री क्षेत्र तुळजापूर व अक्कलकोट दर्शन यात्रा घडवण्यात आली. या यात्रेचे नियोजन सुर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुजाता सूर्यकांत भुंडे यांनी केले होते. एका महिलेकडून महिलांसाठी प्रथमच परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तीर्थ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या यात्रेची माहिती देताना सुजाता सूर्यकांत भुंडे यांनी सांगितले की, परिसरातील आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा झाली. या यात्रेमध्ये परिसरातील जेष्ठ महीलांप्रमानेच युवतींचाही मोठा सहभाग होता. आपला परिसर सांप्रदायिकतेची ओढ असणारा असून महिलांना आपली आवड जोपासता यावी म्हणून महिलांसाठी या तीर्थयात्रेचे आयोजन केले होते.

यावेळी श्री क्षेत्र तुळजापूर व अक्कलकोट येथील दोन्ही ट्रस्ट च्यावतीने युवा नेते सुर्यकांत भुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

या मोफत तीर्थक्षेत्र यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी युवा नेते सुर्यकांत भुंडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, सविता दगडे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, बालम सुतार, प्रदीप हुमे, अमित खानेकर, हरिभाऊ कोकाटे, सचिन दगडे, विनायक सुतार, काका भुंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

See also  अभिजीत दगडे मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छ व निर्जंतुकीकरण अभियानाचे उद्घाटन...!