पाषाण :
अभिजीत दगडे पाटील मित्रपरिवाराच्या वतीने बावधन, पाषाण, सुतारवाडी या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहिम तसेच सॅनिटाईझेशन मोफत स्वछ व निर्जंतुकिकरण अभियानाचे उदघाट्न आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले.
या अभियानाची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अभिजीत दगडे पाटील यांनी मॅकन्युजला सांगितले की, परिसरातील नागरिकांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहिम तसेच सॅनिटाईझेशन मोफत स्वछ व निर्जंतुकिकरण अभियान राबविले आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हे अभियान पोहचविणार आहोत.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे, माजी अध्यक्ष महेश हांडे, स्वीकृत नगरसेवक बालम सुतार, बावधन माजी उपसरपंच बाप्पुसाहेब दगडे, दिपक दगडे, सुर्यकांत भुंडे, योगेश सुतार, प्रदीप हुमे, दिपक कामठे, विनायक काकडे, सचिन भुंडे, स्वप्निल दगडे, अजित भुंडे, समिर उत्तरकर, पवन दगडे आदी जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.