चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवस उस्मान ख्वाजाने गाजविला, झळकावले नाबाद शतक…

0
slider_4552

अहमदाबाद :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 90 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. खेळ संपला तेव्हा कॅमरुन ग्रीन आणि उस्मान ख्वाजा हे दोघेही नाबाद होते.

उस्मान ख्वाजा याचं शतक

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा याने शानदार शतक ठोकलं. ख्वाजा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 104 धावा केल्या. उस्मानने 251 बॉलमध्ये 15 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. तर ग्रीन 64 बॉलमध्ये 8 फोरच्या मदतीने 49 धावांवर नॉट आऊट आहे.

या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाकडून ओपनर ट्रेव्हिस हेड 32 धावांवर बाद झाला. ट्रेव्हिसला आर अश्विन याने रवींद्र जडेजाच्या हाती कॅच आऊट केलं. मार्नस लाबुशेनला मोहम्मद शमी याने स्वसतात आऊट केलं. लाबुशेन 3 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन स्टीव्ह स्मिथने मैदानात घट्ट पाय रोवले होते. मात्र जडेजाने त्याचा काटा काढला. जडेजाने स्टीव्हला 38 धावांवर क्लिन बोल्ड केलं. पीटर हँड्सकॉम्बने 17 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विन आणि जडेजा या फिरकी जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान

दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असेल. ऑस्ट्रेलिया मोठा धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे कांगारुंना लवकरात लवकर ऑलआऊट करावं लागणार आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलिया विरुद्ध कशी रणनिती आखतात, याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

See also  पुण्याच्या हर्षदा गरुड ने इतिहास घडवत ज्यूनियर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक..