महाळूंगे येथे येथे नाद गडांचा ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद..

0
slider_4552

महाळूंगे :

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या (मृत्युंजय दिन) बलिदान दिना निमित्ताने महाळूंगे येथे नाद गडांचा ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.

या रक्तांशिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि पुणे शहर भाजपाचे उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले.

नाद गडांचा ग्रुप महाळुंगे आणि काळूराम गायकवाड युवा मंच यांच्यामार्फत नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.

यावेळी नाद गडांचा ग्रुप चे संस्थापक काळुराम गायकवाड व नाद गडांचा ग्रुप चे अध्यक्ष संतोष पाडाळे व सर्व नाद गडांचा ग्रुप चे सदस्य पृथ्वीराज कोळेकर राजू शेडगे, पंकज पाडाळे, अमोल आंबेकर, मनोज पाडाळे, युवराज धनकुडे, आशिष पाडाळे, अविनाश गोलांडे, लोकेश पाडाळे, धर्मेंद्र पाडाळे, नितिन खैरे, अजय काकडे, अनिल गायकवाड, सचिन पाडाळे, सागर गायकवाड, विजय पाडाळे, शेखर पांडे प्रविण कदम, बाळा मोहोळ ओम गायकवाड ओम पाडाळे, साईराज गायकवाड, तन्मय कोळेकर अनिकेत चिवे, साहील पाडाळे, आधार ब्लड बँक चे डॉक्टर शहापुरकर उपस्थित होते.

See also  बाणेर-सुस-म्हाळुंगे रस्त्यावर स्ट्रीट लाइट बंद असल्याने मशाल आंदोलना द्वारे निषेध.