बाणेर-सुस-म्हाळुंगे रस्त्यावर स्ट्रीट लाइट बंद असल्याने मशाल आंदोलना द्वारे निषेध.

0
slider_4552

पुणे :

बाणेर-सुस-म्हाळुंगे शिव (बेलाकसा सोसायटी ते पाडळे वस्ती) मेन रोडवरील लाईटच्या खांबांवरील स्ट्रीट लाईट गेले अनेक वर्षे बंद आहेत. वारंवार तक्रार करुनही पदपथावरील दिवे सुरु केले जात नसल्याने त्यांनी चक्क या दिव्यांना मशाल लावुन या कारभाराचा निषेध केला आहे. बाणेरच्या नागरिकांनी स्मार्ट सिटीला आंदोलन करून दणका दिला आहे.

पण तक्रारी करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने अडथळ्यांना सामोरे जावे लागणारे नागरिक वैतागले होते. सोयी बरोबरच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत असल्याने अनेकदा नागरिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती. पण प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांनी मशाल आंदोलन द्वारे स्मार्ट कारभाराला पुणेरी झटका दाखवला आहे.

रस्त्यावरील अंधारामुळे महिला, जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात ॲक्सिडेंटचे प्रमाण देखील वाढले आहे. बाणेर-बालेवाडी हा पुणे शहरातील स्मार्ट भाग आहे आणि अश्या परिसरात रस्त्यांवरील लाईट सारख्या मुलभूत सुविधांचाही अभाव आहे. या भागात बहुसंख्य नागरिक हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक वेळा नाईट शिफ्ट्स ला जाणे-येणे या मार्गाने होते, अश्या वेळी स्ट्रीट लाईट्स नसल्यामुळे सुरक्षिततेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

हे दिवे सुरू करण्यासाठी या परिसरातील भाजप युवा नेते लहू बालवडकर यांनी नागरीकांना सोबत घेवून मशाल मार्च काढत पालिकेच्या विद्युत खांबांवर मशाली पेटवून उजेडाची व्यवस्था केली आहे. या वेळी बोलताना बालवडकर यांनी म्हंटले की, या भागातील लोक प्रतिनिधींनी आता तरी हाताची घडी काढून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावे व त्वरित विद्युत दिवे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे.

 

 

See also  समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर  प्रयत्नशील.