पाषाण :
पाषाण तलाव परिसरात पुणे महापालिकेच्या माध्यमातून जॉगिंग ट्रॅक नागरिकांच्या सोयीसाठी विकसित करण्यात आलेला आहे. शहरातील लोक दररोज फिरण्यासाठी सकाळ- संध्याकाळ जॉगिंग ट्रॅकचा वापर करत असतात. ट्रॅकची अवस्था अत्यंत खराब झाली होती म्हणून माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी मुख्य उद्यान अधीक्षक, पुणे महापालिका अशोक घोरपडे यांना निवेदन देत पाषाण तलाव परिसरात असलेला जॉगिंग ट्रॅक तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी केली.
याबद्दल माहिती देताना माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसह, लहान मुले यांचा पाषाण तलाव परिसरात जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात वावर असतो. तरी महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या वापरात असलेला हा जॉगिंग ट्रॅक तात्काळ दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी निवेदन देत केली आहे.