बाणेर – औंध लिंक रोड (मेडि पॉइंट चौक ते बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल चौक) येथे अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई..

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील बाणेर – औंध लिंक रोड ( मेडि पॉइंट चौक ते बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल चौक )  व मुळा नदीचे निळया पूर रेषेतील येथे  दि.२२/०५/२०२३ रोजी  पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ व औंध – बाणेर  क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने संयुक्त कारवाई नियोजित करण्यात आलेली होती. सदर ठिकाणी या अगोदर कारवाई करण्यात आली होती तथापि नागरिकांनी पुन्हा निळया पूर रेषेतील यापुर्वी पाडलेली बांधकामे व  नव्याने बांधकामे केल्याचे निदर्शनास आल्याने या रोडवर पुन:श्च कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई मधे  सुमारे ६७,०००चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता – युवराज देशमुख, सह महापालिका आयुक्त – श्री. खलाटे
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – मा. श्रीकांत वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता – निवृत्ती उतळे, कनिष्ठ अभियंता – संदेश कुवळमोडे, अजित सणस, विश्वनाथ बोटे, डी. एन. जगताप, आरेखक – नविन महेत्रे, टूलीप इंजिनियर-सुरज शिंदे, प्राची सर्वगोड दोन अतिक्रमण निरक्षक व स्टाफ, पोलीस निरीक्षक – राजू अडागळे, राजकुमार केंद्रे व स्टाफ यांच्या पथकाने पाच जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर, एक अग्निशमन व्हॅन, एक क्रेन, १० अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

*पहा ताम्हाणे चौक, औंध(मेडी पॉइंट) रस्त्यावर अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई..*
https://youtu.be/mfEBuOS2qvM

सदर कारवाई होत असताना, कारवाई झालेल्या जागा मालकांमध्ये प्रचंड रोष असुन, अतिक्रमण विभागाने हि कारवाई बिल्डर च्या दबावाखाली करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी अगोदर कारवाई झाली असताना पाडलेल्या पत्राशेडला परत पाडण्याचे काम केले गेले आहे.

See also  "चैतन्यस्पर्श" भक्तांचा मेळावा दरवर्षी आयोजित करून भक्तांची सेवा करणार : लहू बालवडकर