बाणेर :
बाणेर येथील मुख्य बाणेर रस्ता आणि मोहन नगर रस्ता येथे फ्रंट मर्जिन, पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई करत जवळपास आठ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.







सदर कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग आणि पोलीस स्टाफच्या मदतीने करण्यात आली. सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, सह महापालिका आयुक्त संदीप खलाटे, बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता निवृत्ती उतळे, कनिष्ठ अभियंता संदीप चाबुकस्वार, अजित सणस, विश्वनाथ बोटे,आरेखक नविन महेत्रे, सुरज शिंदे, दोन अतिक्रमण निरक्षक व स्टाफ पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पथकाने दोन जेसीबी, एक गॅस कटर, एक ब्रेकर, दोन डंपर आणि १० अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.








