सुसगाव :
सुसगाव येथे २ वर्षांच्या करोना काळानंतर श्री ग्रामदैवत काळभैरवनाथ उत्सव निमित्त शुक्रवार दिनांक २२/०४/२०२२ व शनिवार दि. २३/०४/२०२२ रोजी मोठया प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच राज्यस्तरीय निमंत्रीत कुस्ती स्पर्धेचे आयोजन उत्सव कमिटी तसेच ग्रामस्थांनी केले आहे. मोठया उत्साहात व आनंदात यंदा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक २२/०४/२०२२ रोजी मंदीरात अभिषेक, पुजा तसेच पालखी मिरवणुक आणि गावच्या प्रथेप्रमाणे तमाशाचे देखील आयोजन केले आहे. तर शनिवार दि. २३/०४/२०२२ रोजी “श्री काळभैरवनाथ मानाची गदा” या नावाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेकरीता मोठया दिमाखात नियोजन करण्यात आले असून, त्याची तयारी पुर्ण झाली आहे. या स्पर्धेची पैलवानांची वजने दि. २२/०४/२०२२ रोजी सायंकाळी ६.०० वा. आयरिष लॉन्स या ठिकाणी घेतली जाणार असून राज्यातून आलेले पैलवानांची राहण्याची तसेच जेवनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विजेते होणारे एकूण १० गटात बक्षीस स्वरूपात रू. १५,४६,०००/- पैलवांनाना सुस ग्रामस्थांनी वैयक्तीक स्वरूपात रोख देण्यात येणार आहे. तसेच सहभागी आणि पराभूत पैलवानांनाकरीता १० ते १२ लाख अंदाजे खर्च करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पैहिलवान/पंच तसेच पाहुणे मंडळी यांना जेवणाची व्यवस्था देखील उत्सव कमिटी यांनी केलेली आहे. या स्पर्धेकरीता येणाऱ्या कुस्ती शैकीनासाठी, प्रेक्षकांसाठी, नागरिकांसाठी, क्रिडानगरीत बसण्याची व्यवस्था म्हणून प्रेक्षक गॅलरी जवळ जवळ ३ ते ४ हजार संघटक / रसिक / पाहूणे बसतील असे क्रिडांगण तयार केले आहे. या क्रिडांगणात येणाऱ्या कुस्तीप्रेमी पाहुण्यांसाठी देखील जेवनाची सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आखाड्याचे नियोजन पै. जयसिंग चांदेरे व बाळासाहेब चिमाजी चांदेरे यांचे मार्गदर्शनाखाली चालू आहे.
माती प्रकारातील क्रिडांगणात ही स्पर्धा सपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती गीर परिषदेच्या मान्यतेने व नियमानुसार ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८.०० वा. मान्यवर शुभहस्ते होणार आहे. त्यामध्ये :
१. कृष्ण प्रकाश (पोलीस आयुक्त, पुणे, पिंपरी चिंचवड)
२. दिगंबर दुर्गाडे (अध्यक्ष, पुणे जि.म.प.सह.
बँक)
३. विजय चौधरी (DYSP ट्रीपल महाराष्ट्र केसरी)
४. सुनिल चांदेरे (उपाध्यक्ष, पुणे जि.म.प.सह.बँक)
तसेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुभहस्ते मान्यवर :-
१. सुप्रिया सुळे (खासदार, बारामती लोकसभा)
२. सचिन आहेर (मा. मंत्री / संपर्क प्रमुख, शिवसेना, पुणे)
३. संग्राम थोपटे (आमदार, भोर वेल्हा मुळशी)
४. प्रशांत जगताप (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे)
५. रमेश बागवे (अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस कमिटी)
श्री भैरवनाथ उत्सव कमिटीच्या व ग्रामस्थांच्यावतीने नामदेव चांदेरे, सुहास भोते, नितीन चांदेरे, गणेश सुतार, नेताजी गांडेकर यांनी माहिती दिली.