पाषाण :
गणेशोत्सव म्हटलं की आपल्या जीवनात आगळे वेगळे महत्त्व आहे. गौरी गणपती घरी आल्यानंतर घरातील वातावरण सुंदर आणि प्रसन्न असते. या बाप्पाची गौरायांची विविध पद्धतीने आरास केली जाते. बहुसंख्य भक्त वैविध्यपूर्ण सजावट करून आपला बाप्पा कसा सुंदर दिसेल यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या या प्रयत्नाला अजून उत्साह निर्माण करण्याकरता माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आपल्या संकल्पनेतून घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी विविध आकर्षण वस्तूंचे पारितोषिके विजेत्यांना देण्यात येणार आहेत.
या संकल्पनेची माहिती देताना सनी निम्हण यांनी सांगितले की, गौरी आणि गणपतीचे आगमन होताच प्रत्येक घराला उत्सवाचे रूप येते. कुटुंबातील प्रत्येकजण यात सहभागी होतो आणि आरास केली जाते. माझा बाप्पा, माझी गौरी ही इतरांपेक्षा आकर्षक आणि नेत्रदीपक असावी असे प्रत्येकाला वाटते आणि त्यातून सजावटीची जणू स्पर्धाच ठरते. यात श्रद्धा आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम दिसून येतो. अनेक अभिनव संकल्पना साकारल्या जातात. याचेच कौतुक व्हावे आणि या संकल्पनेस योग्य सन्मान मिळावा म्हणून गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहोत.
पुढे बोलताना त्यांनी सर्व नागरिकांना आव्हान केली की, आपल्या घरातील गौरी गणपती सजावटीचे फोटो अवश्य 8308123555 या नंबर वर १० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर पर्यंत पाठवून या स्पर्धेत सहभागी होवून आकर्षक बक्षिसे जिंकावित. घरीच राहून सुरक्षित पणे आनंदात उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा.
उत्सव साजरा करू पाळून नियम…
उत्साह मात्र पुर्वीप्रमाणे ठेवू कायम !!!