इर्शाळवाडी दरड दुर्घटना; यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा अजित पवार यांचा निर्णय

0
slider_4552

मुंबई :

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात.

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्भारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

See also  नीलम राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्युलर नोटीस जारी