पिंपरी :
संततधार पावसाचा फटका आता पिंपरी-चिंचवड शहराला बसत असल्याचे चित्र पहायाला मिळत आहे. पिंपळे सौदागर येथे आज पहाटे कुणाल आयकॅान रोड वरील छत्रपती चौकातील, नवीन बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी भूस्खलन होत रस्ता खचला आहे. पहाटेच्या वेळी ही घटना घडली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.







या घटनेमुळे रस्त्यात असलेली पाणी पुरवठा लाईन, व स्टॉर्म वॉटर लाईन देखील तुटलेली आहे. पहाटे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी, व परिसरातील सोसायटीमधील नागरिकांनी ही घटना नगरसवेक नाना काटे यांना सांगितली. त्यानुसार नाना काटे यांनी संबधित बांधकाम व्यावसायिक, महापालिका अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाला सांगून त्वरीत उपायोजना करण्यास सांगितले.
त्यानुसार पोलीस व महापालिका विभाग घटनास्थळी पोहचले आहेत. घटनास्थळी बॅरीकेटींग केले असून मनपा विभाग, पाणी पुरवठा विभागातर्फे पाईप लाईन व रस्ता दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.







