औंध येथे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे “रक्षाबंधन एक सामाजिक सुरक्षा’ विषयावरील परिसंवादाचे आयोजन….

0
slider_4552

औंध :

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, औंध तर्फे रक्षाबंधन निमित्त, “रक्षाबंधन एक सामाजिक सुरक्षा’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे करण्यात आले आहे. या परिसंवादात अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडळ संस्थापक संचालक माजी सनदी अधिकारी, भूषण गोखले निवृत्त एअर चीफ मार्शल, संजय आवटे संपादक लोकमत, रितेशकुमार कमिशनर ऑफ पोलीस, पुणे शहर, विक्रम कुमार आयुक्त, पुणे म.न.पा. भानुप्रताप बर्गे निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त सहभाग घेणार आहेत. तसेच सिध्दार्थ शिरोळे आमदार, शिवाजीनगर यावेळी उपस्थित असतील.

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध संस्था २३ वर्षे समाज प्रबोधन आणि अध्यात्मिक प्रगती साठी विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य केले जाते. या मध्ये सण-उत्सव, पालखी सोहळा, वार्षिक कार्यक्रम, मासिक कार्यक्रम, साप्ताहिक कार्यक्रम, नैमित्तिक कार्यक्रम आणि प्रासंगिक कार्यक्रम केले जातात. प्रतिष्ठान तर्फे स्मरणिका, प्रार्थना पुस्तक, तारक मंत्र आणि सीडी इत्यादींचे प्रकाशन झाले आहे. सोशल मिडिया माध्यमातून प्रमुख कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाते.

प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यक्रम

श्री स्वामींची पालखी- वर्ष २००१ पासून २२ वर्षे हा सोहळा साजरा केला जातो. दिंडी – वर्ष २०१० पासून १३ वर्षे जन सामान्यात आनंद आणि उत्साह वर्धक दिंडी कार्यक्रम केला जातो. श्री स्वामीसमर्थ औध’ पुरस्कार- वर्ष २००७ पासून १६ प्रतिष्ठित मान्यवरांना या पुरस्काराने पुरस्कृत केले. परिसंवाद- वर्ष २००७ पासून विविध सामाजिक विषयांवर परिसंवादचे आयोजन केले जाते.

स्वामी आराधना समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी गेल्या १५ वर्षापासून ७५० पेक्षा अधिक कुटुंबात हा कार्यक्रम झाला. नैमित्तिक कार्यक्रम झोपडपट्टीतील आणि शालेय विद्यर्थ्यांसाठी विविध स्पर्धा, वैद्यकीय तपासणी शिबिरे, ज्ञान देऊन सामाजिक एकोपा जपणारे प्रवचन भजन, कीर्तन, संगीताचे कार्यक्रम केले गेले.

या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अडव्होकेट श्रीकांत पाटील, सौरभ देशपांडे कार्याध्यक्ष, योगेश कुलकर्णी कोषाध्यक्ष, अंकुश चोंधे उपाध्यक्ष, अतुल नाडगौडा विश्वस्त,
दिलीप वाणी विश्वस्त यांच्या संकल्पनेतून या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्षाबंधन एक सामाजिक सुरक्षा हा परिसंवाद २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे होणार असून प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  मॉडर्न हायस्कूलचा माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेह मेळावा संपन्न...