- बोपोडी :
आज ११ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा बलिदान दिन, जो आपण “समर्पण दिवस” म्हणून अत्यंत श्रद्धेने स्मरतो. राष्ट्रासाठी पूर्णतः समर्पित असलेल्या या महान विचारवंताला अभिवादन करताना आपण केवळ एका नेत्याचे स्मरण करत नाही, तर एका विचारप्रवाहाचे स्मरण करतो असे मत नगरसेविका सपना छाजेड यांनी व्यक्त केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा बलिदान दिन नगरसेविका सपना छाजेड यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंडित दीनदयाल उपाध्यक्ष यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक आनंद छाजेड, सचिन वाडेकर, अरविंद पाटील, सुप्रीम चोंधे, देवेंद्र बिडलान, अजित पवार, विकास गायकवाड, संगीता कांबळे, हर्षदा भोसले आदी उपस्थित होते.







पुढे बोलताना सपना छाजेड म्हणाले की, पंडितजींचे जीवन साधेपणा, प्रामाणिकता आणि राष्ट्रनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी वैयक्तिक सुखसोयींचा त्याग करून देशसेवेला आयुष्य अर्पण केले आणि राजकारणाला मूल्याधिष्ठित दिशा दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून त्यांनी समाजजीवन समजून घेतले आणि नंतर भारतीय जनसंघाचे संघटन मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या जीवन कार्यात एक संघटक, गहन चिंतन करणारे लेखक, पत्रकार आणि तत्त्वज्ञ म्हणून सातत्याने राष्ट्र कार्यात योगदान दिले.
पंडितजींनी सांगितले होते, “समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले तरच आपले कार्य यशस्वी ठरेल.” हा विचार आजही सामाजिक आणि राजकीय कार्याला दिशा देणारा आहे. अशा थोर विचारांमुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय बलिदान दिवस म्हणजे एका विचारप्रवाहाचे स्मरण आहे असे लक्षात येते असल्याचे सपना छाजेड यांनी सांगितले.








