औंध :
औंध ते डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी १०५ क्रमांकाची बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. PMPMLची ही सेवा अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे औंध-बाणेर परिसरातील नागरिकांकडून ती पुन्हा सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती.







निवडणुकीनंतर हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन नगरसेविका भक्तीताई अजित गायकवाड व इतर स्थानिक प्रतिनिधींनी दिले होते. शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आश्वासनाची पूर्तता करत सोमवारी सकाळी ८:१५ वाजता पहिल्या बसचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड, नगरसेवक सनी निम्हण, अभिजित गायकवाड यांच्यासह आनंद छाजेड, शिरीष नाईकरे, रिपाई चे शिवाजीनगर युवक अध्यक्ष महादेव साळवे , मनोज दळवी, वसंत जुनावणे ,निलेश गायकवाड , सुजाता पाटील, सूर्यकांत कळापुरे ,सतीश तारू ,मारुती पाटील, जॉन प्रकाश, मंगल जाधव, सुरेखा कुलकर्णी तसेच अनेक मान्यवर, स्थानिक नागरिक, महिला-भगिनी आणि पीएमपीएमएल अधिकारी उपस्थित होते.
नगरसेविका भक्ती गायकवाड, व औंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डीपी रोड परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेली ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे औंध-बाणेर ते डेक्कन परिसरातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.








