शिवाजीनगर :
पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे वकीलांसाठी जिल्हा न्यायलय येथे ‘ज्युडीशियल कोलोकिया’ या कार्यक्रमाचे ५ वे पुष्प अशोका हॉल येथे शनिवार दिनांक ०१/१०/२०२२ रोजी दुपारी २.०० वा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय. गोविंदराव सानप साहेब यांच्या “ट्रायल कोर्ट प्रक्रियेतील अडचणी आणि आव्हाने व त्यावरील उपाय” या विषयावरील व्याख्यानाने पार पडले.
या प्रसंगी पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख साहेब व पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष मा पांडुरंगजी थोरवे, भारतीय वकील परिषदेचे सदस्य ऍड. जयंत जायभावे, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद थोबडे व उपाध्यक्ष विवेकानंद घाडगे, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अनुक्रमे ऍड. गजानन चव्हाण, ऍड. वसंतराव साळुंखे, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. अहमदखान पठाण, ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. संग्राम देसाई, ऍड. आशिष देशमुख, ऍड. हे उपस्थित होते. या सर्व उपस्थित वकील परिषदेच्या सदस्यांचा सन्मान असोसिएशन तर्फे करण्यात आला. तसेच पुणे पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. सुभाष मोहिते यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती माननीय. सानप साहेब हे म्हणाले की, नवोदित वकीलांना प्रोत्साहन देने गरजेचे आहे. त्यांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे.तसेच अधिक गतीने कोर्ट ट्रायल कश्या चालतील यावर काम करणे आवश्यक आहे. समन्स, व्हॉरंट बजावणी यांसारख्या प्रक्रिया लवकर होत नाहीत त्यावर पायाभूत उपाययोजना केली पाहिजे. यांसाठी तंत्रज्ञानाचा मदतीने बजावणी प्रक्रिया होणे काळाची गरज आहे. न्यायाधीश व वकील मंडळी या सर्वांनी एकत्र येऊन या दिशेने पावले उचलणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
सदर व्याख्यानाच्या माध्यमातून वकीलांना न्यायाधीशांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग व्हावा व दैनंदिन कामकाज करत असताना त्या गोष्टी अंमलात आणत्या याव्या या हेतूने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे असे पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. पांडुरंगजी थोरवे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. पांडुरंगजी थोरवे यांनी केले.
तसेच सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशन चे खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे यांनी केले व आभार कार्यकारिणी सदस्य ॲड. ॲड. काजल कवडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष ऍड विवेक भरगुडे, उपाध्यक्ष- ऍड. लक्ष्मणराव येळेपाटील, सेक्रेटरी- ॲड. अमोल शितोळे, सेक्रेटरी- सुरेखा भोसले, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले, ऍड. अमोल दुरकर ॲड.तेजस दंडागव्हाळ,ॲड. कुणाल अहिर, ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.