पार्टनर बनवण्याचे आमिष दाखवून फसवणूक, बाणेर येथील दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

0
slider_4552

पुणे :

व्यवसायात गुंतवणूक केल्यास पार्टनर बनवण्याचे आमिष दाखवून एक कोटी 20 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाणेर येथील दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान बाणेर प्राईम रोज मॉलजवळ घडला आहे.

संतोष रंगनाथ चिंचवडे (वय-42) व रोशना संतोष चिंचवडे (वय-39 रा. म्हाळुंगे, बाणेर) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 सह एमपीआयडी कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश गजानन जाधव (वय-39 रा. बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे चिंचवडे फुड्स अँड बेव्हरेजेस व समीक्षा प्रायजेस नावाचे फर्म चालवत होते. त्यांनी पेप्सीको या कंपनीची पुणे जिल्ह्याची डिलरशीप घेतली होती. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच व्यवसायात पार्टनर करुन घेतो असे सांगितले. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्य़ादी व त्यांच्या मित्रांनी 1 कोटी 20 लाख 99 हजार रुपये गुंतवले.

पैशांची गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकराचा परतावा दिला नाही. चिंचवडे यांनी पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याबाबत फिर्यादी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.

See also  नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेरमधील जनसंपर्क कार्यालयाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन.