खेड :
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत महाराणी सईबाई स्मृतीस्थळ स्मारक विकास आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार अतुल बेनके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वहाणे उपस्थित होते.







उत्खननात आढळलेल्या पुरातन वाड्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी 25 कोटी रुपये देण्यात येतील. वाड्याची जागा संपादन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. समाधी स्थळच्या विकासासाठी आराखडा ऑक्टोबर अखेरपर्यंत सादर करावा. दोन्ही ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्यांचाही आराखड्यात समावेश करावा, असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.
खेड तालुक्यात वाफगाव येथील होळकर किल्ला स्मारक विकासाबाबतही यावेळी सादरीकरण करण्यात आले. या परिसरातील शाळा स्थलांतर व स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.








