मुंबई :
संग्राम समेळने योगयोगेश्वर जय शंकर मालिका संपल्यावर भावूक पोस्ट शेअर केलीय. योगयोगेश्वर जय शंकर मालिका ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका, या मालिकेच्या माध्यमातून शंकर महाराजांची कहाणी छोट्या पड़द्यावर साकार झाली.







अशातच मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेण्याचा निर्णय घेतलाय. योगयोगेश्वर जय शंकर मालिका आता बंद होणार आहे. या मालिकेत शंकर महाराजांची भुमिका अभिनेता संग्राम समेळने साकारली. संग्रामने मालिका संपल्याब्दल भावूक पोस्ट शेअर केली.
संग्रामने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलं की,
आणि तो अद्भुत प्रवास संपला. या प्रवासात महाराजांनी खूप शिकवलं, एक कलाकार आणि एक माणूस म्हणून. वैयक्तिक माइयासाठी खूप आव्हानात्मक होती. ही भूमिका करणं शारिरीक आणि मानासिक सूद्धा पावलोपावली महाराज परीक्षा घेत होते. पण तरीही मला सांभाळायला माझी आपली माणसं खंबीर होती. मी कधीही घरापासून इतका काळ लांब राहिलो नव्हतो आणि यावेळी सुद्धा बाहेरगावी डेली सोप घ्यायची मनाची तयारी नव्हती. पण ही भूमिका करायला मला माझ्या बायकोने तयार केलं आणि नुसतं तयार केलें नाही तर खंबीर पणे घर सांभाळलं. माझ्या ८६ वर्षाच्या आजीला सांभाळलं ”
संग्राम पूढे लिहीतो, “कितीतरी वेळा स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करून घर सांभाळले, जेणेकरून मला माझे काम नीट करता यावं. माझे आई बाबा जे सतत आम्हा दोघांच्या पाठीशी होते, आम्हाला दोघांना कधीही खचू दिलं नाही. मी लांब असण्याची त्यांची तळमळ कधी माझ्यापर्यत पोहोचू दिली नाही. जेणेकरून मला माझ्या कामात १०० टक्के देता यावेत. माझे आई बाबा म्हणजे माझे पहिले समीक्षक ज्यांनी वेळोवेळी माझं कौतुकही केलं आणि कमी पड़लो तिकडे कान पण धरले कारण मला त्यांनीच सगळे शिकवलंय.”
संग्राम शेवटी लिहीतो, “आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा एक असा माणूस ज्याच्याशिवाय मी महाराजांची भूमिका कधीच वठवू शकलो नसतो तो म्हणजे बाळकृष्ण तिडके, ज्यांनी माझ्याकडुन महाराजांचे हावभाव, लकबी, चालणं, बोलणं सगळं करून घेतलें. बाळुदादा ही भूमिका आपण दोघांनी साकारलीय.
“कलर्स मराठी या वाहिनीच्या पहिल्या काही मालिकांपैकी एक म्हणजे ‘असावा सुंदर स्वप्नाचा बंगला’ तेव्हापासून मी कलर्सबरोबर काम करतोय. पण या भूमिकेसाठी मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. विराज राजे सर, किर्तीकुमार नाईक सर, ऋषिकेश सर मनापासून आभार. आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्यांनी मला तुमच्या दैवताच्या भूमिकेत स्वीकारलं, प्रेम दिलं, आदर दिला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. जय शंकर….!
https://www.instagram.com/p/CyYoZveNcPQ/?igshid=MzRlODBiNWFlZA==








