सोलापूर :
सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सदरील व्यतक्तीला ताब्यात घेतलंय. चंद्रकांत पाटील यांच्याकड़े सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. पहिल्यांदाच ते रविवारी सोलापुरात दाखल झाले होतं.शासकीय विश्रामगृह येथे भीम आर्मीच्या एका कार्यकत्यनि त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.







शाई फेकल्यानंतर सदरील भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज्य शासनाने सरकारी नोकरीमध्ये सुरु केलेल्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्याने हे पाऊल उचललं.
यावेळी काही कार्यकर्त्यानी घोषणाबाजीदेखील केली आहे. सदरील व्यक्तीला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेमध्ये स्वतः पोलिस अधीक्षकांची उपस्थिती होती. तरीहीदेखील ही घटना घडली आहे.
यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये फेस शिल्ड लावून हजेरी लावली. रविवारी पुन्हा त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला.








