पुणे :
सिकंदर शेखनं अखेर महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं. त्याने गतवर्षीची हुकलेली संधी यंदा न दवड़ता मानाची गदा आपल्या खांद्यावर घेतली. त्याने गतवर्षीचा महाराष्ट्र कसरी शीवराज राक्षेला अस्मान दाखवत विजेतेपद पटकावलं.







महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या अंतिम सामन्यात गंगावेस तालमीत कुस्तीचे धडे गिरवणारा सिकंदर शेख आणि गतविजेता महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यात यंदाची फायनल झाली. शिवराज राक्षे दुसर्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र कैसरीचं मैदान मारत गतवर्षीच्या पराभावची सल दूर करणार याकडे कुस्ती चाहत्यांच लक्ष होतं. अखेर सिकंदर शेखनं शिवराज राक्षेचा पराभव करत मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
उपांत्य फेरीत गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षद कोकाटेचा पराभव केला अन् डबल महाराष्ट्र कैसरीसाठी शंडू ठोकला. तर माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेवर 10 – 0 असा दणदणीत विजय मिळवत यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा आपलीच असल्याचे संकेत दिले होते.
सिकंदर शेख याचा मागच्या केसरी स्पर्धेमध्ये पराभव झाला होता. यंदा त्याच्याकड़े नामी संधी होती. शिवराज राक्षे याने मागील वर्षी महेंद्र गायकवाड याचा पराभव करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीवर नाव कोरलं होतं. यंदा मात्र सिकंदर शेखनं त्याचं डबल केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.








