राज्य सरकारने दिली किराणा दुकांनांमध्ये वाईनची विक्री करण्यासाठी परवानगी

0
slider_4552

मुंबई :

राज्य सरकार किराणा दुकांनांमध्ये वाईनची विक्री करण्यासाठी परवानगी देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्यातच आता मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

किराणा दुकानामध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकराच्या तिजोरीत भर पडणार आहे.

किराणा दुकानातून वाईन खरेदी करताना एका लिटरमागे 10 रूपये कर आकारला जाणार आहे. या अतिरिक्त करामुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 5 कोटींचा महसुल जमा होणार आहे. त्यासोबतच वाईन विक्रीची माहिती सरकारला कळण्यास मदत होणार आहे. सरकारने अध्यादेशात काही अटी देखील घातल्या आहेत. ज्याठिकाणी वाईन विक्री करावयाची आहे ते किराणा दुकान 1000 चौरस फुटांपेक्षा मोठे असले पाहिजे, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वाईनच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शेती उत्पादनाला विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच द्राक्षे, मोसंबी, संत्रा, ऊस आणि वाईन निर्मिती लागणाऱ्या पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदा होणार आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने वाईन विक्रीला किराणा दुकानांमध्ये परवानगी दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. पेट्रोल डिझेल ऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारू विक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नविन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

See also  ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी आणि एमआरआय मशीन बसवणार : राजेश टोपे