बालेवाडी :
बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी श्री. खंडेराय प्रतिष्ठान च्या भव्य प्रांगणात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे राजाराम बालवडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री. म्हातू बालवडकर विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, स्फूर्तीगीत व ध्वजगीताचे गायन केले.







खंडेराय प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सागर बालवडकर यांनी यावेळी शुभ संदेश देताना उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यापकवृंदानी कोविडच्या काळामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवावी असे सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे म्हणजेच राष्ट्रकार्य होय असे सांगितले. प्रमुख पाहुणे राजाराम बालवडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उफळ डी. आर. यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या व्यतिरिक्त पांडुरंग साळगावकर, ॲड. माशाळकर, दत्तात्रय देशमुख, मित विज, मानसी पाटील व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून सोहळा संपन्न करण्यात आला.








