अनावश्यक कॉल आणि मेसेजची करता येणार थेट तक्रार

0
slider_4552

मॅक न्यूज नेटवर्क :

अनावश्यक कॉल आणि मेसेज तसेच फसवेगिरीच्या कॉलने अनेकजण त्रासले आहेत. यावर आळा घालण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने डीएनडी ॲप विकसित करण्यासाठी पावले उचलली आहेत. हे ॲप तयार झाले असून त्यात काही त्रुटी आढळल्याने त्यावर पुन्हा काम सुरु असून हे दोषरहित ॲप मार्च 2024 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

डीएनडी ॲपमुळे अनावश्यक कॉल, मेसेज तसेच दिशाभूल करणारे कॉल आल्यास त्याबाबत ट्रायला माहिती पाठवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होईल. हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मात्र ॲंड्रॉईड प्रणाली असणाऱ्यांना या ॲपचा वापर करण्यास अडथळे येत आहेत. डीएनडीच्या सहाय्याने स्मॅप कॉलचे रिपोर्टिंग करताना अडचण येत आहे. विनाकारण येणाऱ्या मेसेज बाबत तक्रार करण्यासही अडथळा येत आहे.

यासोबतच ॲपल कंपनीने तिच्या आयओएस प्रणालीवर हे ॲप डाउनलोड करण्याची सुविधा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्रायकडून कंपनीसोबत बोलणी सुरु आहेत. सध्या ट्रायचे डीएनडी 3.0 हे ॲप उपलब्ध आहे. यामध्ये एसएमएससाठी इंटेलिजंट स्मॅप डिटेक्शन इंजिन आहे. फसवे आणि अनावश्यक कॉल, संदेश ओळखण्याची क्षमता या ॲपमध्ये आहे. असे कॉल आणि संदेश आल्यानंतर त्याचे स्त्रोत शोधण्याची क्षमता यात आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करणे सोपे जाणार आहे.

डीएनडी मध्ये सुधारणा करण्यासाठी ट्रायने स्वतंत्र एजन्सीची नेमणूक केली आहे. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचे या यंत्रणेपुढे मोठे आव्हान असेल. एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब आवाज काढून, चेहरा दाखवून फसवणुकीचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे त्याबाबत देखील डीएनडीला सक्षम करणे आवश्यक आहे.

See also  महापालिका निवडणुका मार्चमध्ये घेण्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू...!