औंध :
औंध क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना नवी दिल्ली येथे गोल्डन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.







दापकेकर यांनी पांचगणी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील केलेल्या कामगिरीमुळे, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर गोल्डन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
गिरीश दापकेकर यांना 2022 मध्येही पांचगणी येथे कार्यरत असताना घनकचरा व्यवस्थापन व पर्यटन क्षेत्रातील कामगिरीमुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त केला होता.
याबाबत बोलताना दापकेकर यांनी सांगितले की, पुरस्कारामुळे जवाबदारी वाढते. त्याच जवाबदारीने आता सध्या असलेल्या औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जास्तीत जास्त कार्य करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.








