पाषाण सुतारवाडी महामार्ग लगत असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई….

0
slider_4552

पाषाण :

पाषाण सुतारवाडी भागातील मुंबई पुणे महामार्ग वरील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉल, हाँटेल वर बांधकाम विकास विभागाचे वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.

सदर बांधकाम हे उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवडय़ात उर्वरित दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.

यावेळी jwa कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हिंजवडी पोलीस स्टेशन चीफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन्याबापू देशमुख, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कांदे, यशवंत साळुंके व ईतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

सदर कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ यांनी पूर्ण केली.

 

मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम होत असून यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. सध्या कारवाई केली असली तरी पुन्हा जैसे थे परिस्थिती होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच कारवाई केलेल्या समोरील बाजूस मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे हॉटेल थाटण्यात आले आहेत. त्यावरही लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

See also  वृक्ष गजानन पर्यावरण पूरक संकल्पना डॉ. सागर बालवडकर यांच्या माध्यमातून सुरू.